दिल्लीतील चार शाळांना बॉम्बची धमकी

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
bomb threat email दिल्लीतील चार शाळांना सोमवारी ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. या धमक्यांमुळे शाळांमध्ये घबराट पसरली. तथापि, दिल्ली अग्निशमन सेवेच्या एका अधिकाèयाने नंतर या धमक्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले. अधिकाèयाच्या म्हणण्यानुसार, सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आल्या. स्थानिक पोलीस आणि शाळा प्रशासनाच्या समन्वयाने शोध आणि स्थलांतर मोहीम राबवण्यात आली. पथकांनी परिसराची कसून तपासणी केली. कुठेही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत. सर्व धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. या शाळांमध्ये दिल्ली कॅन्टमधील धौला कुआँ आणि शंकर विहार येथील आर्मी पब्लिक स्कूल, तसेच द्वारका सेक्टर 14 येथील सीआरपीएफ शाळेचा समावेश आहे.

Delhi school bomb threat email