जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
जिल्हा उपनिबंधकाच्या हाती कारभार

यवतमाळ, 
District Central Bank जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले असून, बँंकेवर प्रशासक नेमण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सोमवार, 27 एप्रिल रोजी संचालक बरखास्तीचे आदेश धडकले आहेत. मुदत संपूनही निवडणूका न झाल्याने प्रलंबित स्थिती निर्माण झाली होती.
 
 
District Central Bank
 
District Central Bank  त्यावर शिक्कामोर्तब करीत शासनाने थेट हस्तक्षेप केला आहे. सोमवार, 27 एप्रिल रोजी शासनाचे आदेश प्राप्त होताच. जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी प्रशासक म्हणून तत्काळ पदभार स्वीकारला असून, बँकेचा कारभार आता पूर्णपणे प्रशासनाच्या हाती राहणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची मुदत 20 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे निवडणुक प्रक्रिया सुरू झाली होती. प्रारुप मतदारयादी आक्षेप दाखल स्वीकारण्याच्या टप्यावर असताना न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश दिला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया लांबली आहे. मुदत संपल्यानंतरही संचालक मंडळ कायम राहिल्याने कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. कायद्यांनुसार अशा परिस्थितीत प्रशासक नेमण्याची तरतूद आहे. त्यानुसार शासनाने हा निर्णय घेतला आहे.