लिफ्ट कोसळली; महिला कर्मचारी गंभीर जखमी!

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
नाशिक,
lift-collapsed : डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथे सोमवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. कॉलेजच्या इमारतीतील लिफ्ट अचानक कोसळल्याने एक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली. ही घटना नाशिकच्या आडगाव परिसरात घडली.
 
 
 
nashik
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती शिवाजी आहिरे (५०) या महिला कर्मचारी सफाईचे काम करत असताना ही दुर्घटना घडली. त्या लिफ्टजवळ गेल्या असता वरच्या मजल्यावरून लिफ्ट अचानक खाली आली आणि त्या अडकल्या. या घटनेत त्यांच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
 
अपघातानंतर परिसरात मोठी घबराट पसरली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली असून घटनेनंतर भावनिक दृश्य निर्माण झाले.
 
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. लिफ्टचा दरवाजा कसा उघडा राहिला आणि तांत्रिक बिघाड झाला का, याची चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर शहरातील लिफ्ट सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले असून अशा यंत्रणांची नियमित तपासणी करण्याची मागणी होत आहे.