रेल्वे स्थानकावर ३.९० किलो अमली पदार्थ जप्त

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
नागपूर,
drugs-seized-at-railway-station : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तसेच बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यासाठी सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने नागपूर रेल्वे स्थानकावर कारवाई करीत ३.९० किलो अमली पदार्थ (गांजा सदृश) जप्त करण्यात आला. अंदाजे ७८ हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थाची व्हिडिओग्राफी करून जप्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
 
ngp
 
 
 
रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ एका संशयित व्यक्तीस थांबविण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव मोहित सिंदूर, रा. जिल्हा बालंगीर (ओडिशा) असे सांगितले. संशयाच्या आधारे त्याच्याकडे असलेल्या रंगाच्या पाठीच्या बॅगची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये टेपने गुंडाळलेले एकूण चार पॅकेट आढळून आले. डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने तपासणी केली असता अमली पदार्थ असल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर राजपत्रित अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत नियमानुसार पॅकेट्सची तपासणी व वजन करण्यात आले.