- चार ते पाच वाहनांना दिली धडक
अनिल कांबळे
नागपूर,
एका भरधाव Eicher truck accident आयशर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित वाहनाने रस्त्यावर हैदाेस घातला. एकापाठाेपाठ चारचाकीसह दुचाकी वाहनांना धडक दिली. तसेच लग्नाच्या वरातील नाचत असलेल्या काही युवकांनासुद्धा धडक दिली. या विचित्र अपघातात रस्त्यावरील वाहनांचे लाखाेंचे नुकसान झाले. ही घटनाश रविवारी रात्रीच्या सुमारास घडला. या प्रकरणी हुडकेश्वर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Eicher truck accident रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पिपळा फाटा राेडवर क्वीनसलँड सेलिब्रेशन लाॅनच्या समाेरुन मनाेहर रामाजी चचाणे (वय 68) हे कुटुंबासह चार चाकी वाहन (क्र. एमएच-49 यू-5851) ने जात असताना आयशर गाडी (क्र.एमएच40,वाय4566) वाहन चालकाने वाहन निष्काळजीपणे व भरधाव चालवून फिर्यादी यांच्या वाहनास धडक दिली.अपघातामध्ये चचाणे यांच्या कारचे माेठे नुकसान झाले तसेच त्यांच्या मागे येणाèया टाटा पंच वाहनासही धडक बसली. पुढे संबंधित ट्रकने आणखी एक मारुती डिझायर कारला धडक दिली. सदर अपघात हा संबंधित वाहन चालकाच्या निष्काळजीपणा व बेदरकारपणामुळे घडलेला असून त्यामध्ये वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.