विद्युत वितरणप्रणाली सुव्यवस्थित करा
दिग्रस,
Electricity distribution system कोणतीही पूर्वसूचना न देता चार-चार तास विद्युत खंडित करणे, दादागिरीने थकीत विज बिलाची रक्कम वसूल करणाऱ्या येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन सोमवार, 27 एप्रिलला भाजपाने चांगलाच समाचार घेतला. तापत्या उन्हात लाईन येजा करीत असल्याने सर्वसामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. विज वितरण कंपनीच्या मोबाईल क्रमांकावर उडवाउडवीचे उत्तर दिले जात आहे. यासंदर्भात नागरिकांनी भाजपाचे शहराध्यक्ष अभय इंगळे यांच्याकडे विद्युत कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरुद्ध रोष व्यक्त केला.
Electricity distribution system भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्युत कार्यालय गाठून सध्या पदभार असलेल्या सहायक अभियंता रंजना मेश्राम यांच्याशी चर्चा केली. वेळेवर आपल्या विद्युत बिलाचा भरणा करणाèया लोकांना विनाकारण त्रास देणार असाल तर आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडू नका असा इशारा देत त्वरित उपाय योजना करा यात तांत्रिक अडचणी दुर करा अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे यांनी केली. या प्रसंगी भाजपा महिला शहराध्यक्ष जागृती मेहता, व्हिजीएंटी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज राठोड, एसआयआर प्रमुख अरुण राठोड, मन की बात प्रमुख रमेश करवा, सुरेंद्र मिश्रा, उपाध्यक्ष संतोष मांजरखेडे, अल्पसंख्यक आघाडी शहराध्यक्ष वाजीद शेख, अनिल भरारे, प्रमोद बनगिनवार, सुभाष काटेकर, हनुमान रामावत, संजय घरत, अमित चिद्दरवार, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
पुढील आठवड्यात सर्व प्रॉब्लेम दूर होतील
वारंवार विद्युत खंडित होत असल्याने यावरचा कायमचा तोडगा काढू पुढील आठवड्या पर्यंत विज वितरण प्रणाली सुव्यवस्थित करुन लोकांना दिलासा देणार असल्याचे अमरावती येथील मुख्य अभियंता अशोक साळुंखे हे मोबाईलवरुन शहराध्यक्ष अभय इंगळे यांच्याशी बोलले आहे. वारंवार विज खंडित होणारा त्रास विद्युत कार्यालय दूर करेल का, याकडे दिग्रसकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.