यवतमाळ जिल्ह्यात कृषी साहित्य विक्रेत्यांचा ‘एल्गार’

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
निविष्ठा बंद : मागण्यावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी

यवतमाळ, 
'Elgar' of agricultural material sellers राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील प्रलंबीत अडचणीबाबत राज्याच्या कृषी विभागाकडून तातडीने निर्णय होत नसल्याने जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद या ठिकाणी सोमवार, 27 एप्रिलपासून बेमुदत विक्री केंद्रे बंद करण्यात आले आहे. विक्रेत्यांच्या या भूमिकामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या बियाणे, रासा खते व किटकनाशक औषधे विक्री व्यवसायातील अडीअडचणीवर निर्णय घेण्यात यावा. यासाठी विक्रेत्यांच्या माफदा संघटनेकडून राज्याचे कृषी मंत्री, राज्याचे प्रधान सचिव (कृषी), राज्याचे आयुक्त कृषी महाराष्ट्र व कृषी संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण पुणे यांचेकडे गेली 5 वर्षे पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतू कृषी विभागाकडून विक्रेत्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या मागण्यासाठी कृषी सेवा केंद्र चालकांनी बेमुदत बंद पुकारला आहे.
 
 
sahitya
 
'Elgar' of agricultural material sellers  यावेळी कंपन्याकडून रासायनिक खतांचा पुरवठा होताना होत असलेले लिंकींग बंद करण्यात यावी. शेजारील राज्यातून येणारे अप्रमाणीत एचटीबीटी कपाशी बियाणे शेतकरी हितार्थ प्रतिबंधित होणे, विक्रेते सर्व प्रकारचे बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके पुरवठादार कंपन्यांकडून सिलबंद पॅकिंगमध्ये खरेदी करून शेतकèयांना सीलबंद पॅकींगमध्येच विक्री करीत असल्यामुळे, तपासणीत बियाणे, खते व कीटकनाशकांचे नमुने फेल गेल्यास, विक्रेत्यास आरोपी न करता साक्षीदार म्हणून मान्य करण्यात यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.