कारंजा लाड,
Fake seeds येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रकाश सभागृहात आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वपूर्ण ‘खरीप हंगाम पूर्व आढावा सभा’ उत्साहात पार पडली. कारंजा-मानोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार सई प्रकाश डहाके यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सन २०२६-२७ च्या खरीप हंगामात शेतकर्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेला उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, कृषी विकास अधिकारी अभिजीत देवगिरकर, कारंजा तालुका कृषी अधिकारी अश्विनी भोसले तसेच मानोरा तालुका कृषी अधिकारी रोशन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीला अश्विनी भोसले यांनी सन २०२५-२६ मध्ये राबविण्यात आलेल्या विविध कृषी योजनांचा आढावा सादर केला. तसेच आगामी खरीप हंगामासाठी बियाणे उपलब्धता, खत पुरवठा आणि कीड नियंत्रणाबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.तर रोशन भागवत यांनी मानोरा तालुयातील खरीप नियोजन सादर करताना विशेषतः सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी राबविण्यात येणार्या मोहिमा स्पष्ट केल्या.
कृषी विकास अधिकारी अभिजीत देवगिरकर आणि उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी मार्गदर्शन करताना बोगस बियाणे व खतांची विक्री रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले. तसेच शेतकर्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी, असे आवाहनही करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात Fake seeds आमदार सई डहाके यांनी कृषी विभागाला स्पष्ट सूचना देत सांगितले की, हंगामाच्या काळात शेतकर्यांना खते व बियाण्यांची टंचाई भासू नये याची विशेष काळजी घ्यावी. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांना वेळेवर मदत आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळणे अत्यावश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. या सभेला कारंजा व मानोरा तालुयातील मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाळके यांनी केले, तर आभार मंगेश सोळंके यांनी मानले.या आढावा सभेमुळे आगामी खरीप हंगामासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.