नागपूर,
feeder-bus-service-launched : महा मेट्रोने, महानगरपालिकाच्या सहकार्याने प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचार्यांसाठी समर्पित फीडर बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. हिंगणा शैक्षणिक पट्ट्यातील ‘लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी’ सुधारण्याच्या दिशेने महा मेट्रोचे एक मोठे पाऊल होय.
प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण धाले, डॉ. रोटे, डॉ. विरेंद्र टाकसांडे यांच्या हस्ते फीडर बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी पुरुषोत्तम निमसारकर, महा मेट्रोचे संयुक्त महाव्यवस्थापक (एमएमआय) महेश मोरोणे आदी उपस्थितीत होते.
लोकमान्य नगर मेट्रो स्थानकाजवळील टी-पॉइंट परिसरात विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. येथे दुचाकी, चारचाकी आणि मोठ्या संख्येने ऑटो-रिक्शा आदींची वर्दळ असल्याने प्रवास वेळखाऊ व असुविधाजनक ठरत असल्याने फीडर बस सेवेची सुरूवात करण्यात आली आहे.
नवीन फीडर सेवा नागपूर मेट्रोच्या लोकमान्य नगर मेट्रो स्थानकाला हिंगणा परिसरातील महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाशी जोडल्या गेले आहे. महाविद्यालयाच्या वेळापत्रकानुसार नियोजित, परवडणारी आणि विश्वासार्ह प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फीडर बस सुरू झाल्यामुळे प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे येणार्या-जाणार्या प्रवाशांना आता अधिक सुरक्षित, सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.