गो सन्मान अभियान जनजागृती रॅलीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
बुलढाणा, 
Gau Samman Abhiyan janjagruti Rally राज्यात गोवंश संरक्षण संवर्धन तसेच प्रतिबंधक कठोर कायदा निर्माण संबध केंद्रिय कानून बनवावे गोपालन मंत्रालय स्थापन करावा या प्रमुख मागणीसाठी गो सन्मान अभियानाच्या वतीने दि. २७ एप्रिल रोजी दुपारी स्थानिक जिजामाता प्रेक्षागार येथून जनजागृती रॅलीद्वारे जिल्हाधिकारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावे निवेदन सादर करण्यात आले.
 
 
rally
 
Gau Samman Abhiyan janjagruti Rally निवेदनात नमूद केल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात प्रभू श्रीराम मंदीर निर्माण जन्मू काश्मीर ३७० हटविण्याचे ऐतिहासिक निर्णय व कार्यपूर्ती झाली आहे. भारतीय देशी गोवंश आमची सांस्कृतिक अध्यात्मिक विरासतचे जीवंत प्रतिक आहे. जोपर्यंत गोमात असुरक्षित आहे. तोपर्यंत सांस्कृतिक पूर्णता अपूर्ण आहे. गोमातेचा राष्ट्रीय सन्मान देऊन पूर्ण सुरक्षा देण्याच्या हेतूने केंद्रिय कायदा बनवावा तसेच गोपालन मंत्रालय स्थापन करावे गोवंश केवळ आस्थेचा विषय नाही. परंतू ग्रामीण अर्थव्यवस्था आत्मनिर्भर भारत शेतकर्‍यांसाठी रासायनिक खाद्यच्या विषचक्राला गोआधारित कृषी संवर्धन निरोगी सात्वीक आहार पशूधन पालनच्या माध्यमातून शक्य आहे. या प्रमुख मागणीसाठी बुलढाणा शहरातून गोसेवा सन्मान अभियान, विश्व हिंदू परिषद पदाधिकारी व सदस्यांनी जनजागृती रॅलीद्वारे निवेदन सादर केले.