उमरखेड येथे निवेदन सादर
उमरखेड,
'Gau Samman Diwas' ‘गो सम्मान आव्हान अभियान’अंतर्गत 27 एप्रिल रोजी देशभरात विविध ठिकाणी गोमातेच्या सन्मानासाठी आंदोलन व निवेदन सादर करण्यात आले. या पृष्ठभूमीवर उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे गोरक्षक समिती, विविध हिंदू संघटना तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आपली मागणी प्रशासनापर्यंत पोहोचवली.
'Gau Samman Diwas' यावेळी कार्यकर्त्यांनी गाय, नंदी व बैलजोडींसह उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठत वातावरण धार्मिक व भावनिक केले. यावेळी गोमातेचा सन्मान व्हावा, देशात कठोर गोहत्या बंदी कायदा लागू करावा, गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा द्यावा, अवैध गो वाहतूक थांबवावी तसेच कत्तलखाने बंद करावे, अशा मागण्या केल्या. कार्यकर्त्यांच्या वतीने राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या नावे तयार करण्यात आलेले निवेदन तहसीलदार राजेश सुरडकर यांना सुपूर्द केले. या आंदोलनात परिसरातील मोठ्या संख्येने गो रक्षक, हिंदू संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात ‘जय गोमाता..’ अशा घोषणा देत गोसंरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली.