कारंजा शहरात दोन कोटीच्या विकास कामाचे भूमीपूजन

शहराच्या विकासकामात भर पडणार

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
प्रभाग क्रमांक ८ मध्ये साकारणार 'नमो उद्यान'
​कारंजा (घाडगे),
Karanja city महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील ३९४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी ₹१ कोटी निधीतून नमो उद्यान योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत लहान मुलांसाठी खेळणी असलेले आधुनिक बागा विकसित करण्यात येत आहेत.अशाच प्रकारचे नमो उद्यान करिता १ कोटी रुपयांची तरतूद कारंजा नगरीतील प्रभाग क्रमांक ८ येथे मंजूर झालेले असून शहरातील नागरिकांना निसर्गरम्य वातावरण आणि विरंगुळ्याचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित असलेल्या 'नमो उद्यान' च्या भूमिपूजनासह शहरातील दोन्ही स्मशानभूमीच्या विकासाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा नगरपंचायतच्या अध्यक्षा स्वातीभिलकर व शिवसेना आर्वी विधानसभा प्रमुख नितीन दर्यापूरकर यांच्या शुभहस्ते शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रशांत शहाडगावकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत २५ एप्रिल रोजी मोठ्या थाटात पार पडला.
 
Karanja city
 
​येथील प्रभाग क्रमांक ८ मध्ये खुल्या जागेत नमो उद्यानाकरीता १ कोटी रुपये मंजूर झाले असून तेथे प्रशस्त नमोउद्यान विकसित होणार आहे. Karanja city या उद्यानाच्या प्रस्तावित कामाचा कारंजा नगर पंचायत पदाधिकाऱ्याकडून कुदळ मारून अधिकृत शुभारंभ करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात एका सुसज्ज उद्यानाची गरज भासत होती, जी या प्रकल्पामुळे पूर्ण होणार असल्याचे म्हटले आहे विविध प्रजातींची वृक्षलागवड करून येथे 'ऑक्सिजन झोन' तयार केला जाणार आहे. नागरिकांसाठी वॉकवे,लहान मुलांसाठी अत्याधुनिक आणि सुरक्षित खेळणी,पिण्याचे शुद्ध पाणी, बसण्यासाठी बेंचेस या सुविधांसह सुशोभित प्रवेशद्वार ही या उद्यानाची आकर्षणे राहणार असल्याचे म्हटले आहे.विशेषतः यामध्ये वृद्ध आणि लहान मुलांसाठी खास राहणार आहे.
 
 
सोबतच स्मशानभूमीच्या विकास कामाचाही झाला शुभारंभ
​ कारंजा शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील खर्डीपुरा येथील स्मशानभूमी करीता ५५.७४ लक्ष रुपये मंजूर झाले असून प्रभाग क्रमांक १५ मधील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या स्मशानभूमी करीता ४५.०९ लक्ष मंजूर झाले आहे. या दोन्ही स्मशानभूमीच्या विकास कामाचा शुभारंभ याचवेळी भूमिपूजनाने करण्यात आला. Karanja city दोन्ही स्मशानभूमीत शोकसभा मंडप आणि सौंदर्यीकरण होणार असल्याचे स्वीकृत नगरसेवक नितीन दर्यापूरकर यांनी म्हटले आहे.
 
 
या भूमिपूजन सोहळ्याच्या अध्यक्ष नगरपंचायत च्या अध्यक्षा स्वाती भिलकर या होत्या तर शिवसेना आर्वी विधानसभा प्रमुख नितीन दर्यापूरकर, ज्येष्ठ नागरिक अजबराव भोकरे, संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळचे अध्यक्ष राजेश काळबांडे, नगरपंचायत उपाध्यक्ष भगवान बुवाडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रशांत शहाडगावकर, बांधकाम सभापती संजय मस्की, महिला व बालकल्याण सभापती मधुमाला दुधकवरे, नगरसेवक कमलेश कठाणे ,राजेंद्र लाडके, विशाल इंगळे, हेमंत बन्नगरे , नगरसेविका नीता मिश्रा व रंजना ढबाले, माजी शिक्षण सभापती सतीश इंगळे, शहराध्यक्ष महिला शिवसेना गीता कळसकर, यांच्यासह शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते आणि Karanja city नागरिकांची उपस्थिती होती. भूमिपूजन सोहळा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन नगरसेवक हेमंत बन्नगरे यांनी केले.
स्मशानभूमीचे सुशोभीकरण, अंत्यसंस्कारासाठी शेड,व बाजूला लोकांना बसण्याकरिता सुद्धा शेड,पाणी, बाकडी यांसारख्या अनेक व्यवस्था आम्ही केलेल्या आहे.गेल्या दोन वर्षात आम्ही जी विकासकामे केलेली आहे अशी विकासकामे यापूर्वी कारंजा नगरीमध्ये कधीही झालेली नाही. यानंतर कारंजा मध्ये आणखी भरपूर कामे होणार आहे. कारंजा मध्ये पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारंजा शहरातील नमो उद्यानाकरिता व स्मशानभूमी विकासाकरीता दोन कोटी रुपये दिले. Karanja city त्यामुळे विकास कामे पूर्णत्वास जाऊन शहराच्या सौंदर्यकरणात आणि वैभवात निश्चितच भर पडेल. या प्रकल्पांच्या दर्जा वाढवण्यासाठी विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नगरपंचायतीला ५ कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहे आणि आम्ही एक उत्कृष्ट नमो उद्यान तयार करून या बक्षीसाचे मानकरी होण्याचा आमचा प्रयत्न राहील व आमच्या या प्रयत्नाला नक्कीच यश येईल.
 
नितीन दर्यापूरकर
स्वीकृत नगरसेवक व आर्वी विधानसभा प्रमुख शिवसेना.
मी काँग्रेस पक्षात असतांना निवडून आल्यावर विकासाची कामे होत नव्हती त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना या पक्षात पक्षप्रवेश केला.कारंजा शहरात विकासकामांना गती यावी म्हणून आम्ही सर्व नगरसेवक विकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि यात आम्हाला भरपूर प्रमाणात यश प्राप्त झालेले आहे. Karanja city गेल्या दोन वर्षात आम्ही भरपूर कामे आणलेली आहेत.
 
स्वाती भिलकर
अध्यक्षा,नगरपंचायत कारंजा(घा.)