गुप्ता पॉवर कंपनीवर कठोर कारवाईचा प्रस्ताव

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांची माहिती
पर्यावरण मंत्र्यांच्या दौर्‍यानंतर ‘एमपीसीबी’चे उघडले डोळे

चंद्रपूर, 
Gupta Power Company तालुक्यातील उसेगावात कोळश्यावर चालणारा गुप्ता पॉवर कारखाना आहे. त्यातून होणार्‍या हवा व पाण्याचे प्रदूषण कमालीचे असून, परिसरातील शेतकर्‍यांचा कापूसही काळवंडला आहे. शेतपिकाचे प्रचंड नुकसान व आरोग्याच्या प्रश्नांनी त्रस्त ग्रामस्थ अगदी हवालदिल आहे. ही बिकट स्थिती पाहण्यासाठी खुद्द पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी 16 एप्रिलला येथे दौरा केला. त्यानंतर कुठे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांचे डोळ उघडले. मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी, आता या कारखान्यावर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव मुख्यालयाला पाठवला आहे.
 
 
Gupta Power Company
 
Gupta Power Company  गुप्ता पॉवर कारखान्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, यात वाद नाही. आम्ही वारंवार नोटीस बजावल्या आहेत. मात्र, कारखाना बंद करणे हा पर्याय असू शकत नाही. कारण त्यावर रोजगार अवलंबून असतो. मात्र, आता या कारखान्यावर कठोर कारवाई व्हावी, असा प्रस्ताव आम्ही मुंबई मुख्यालयाला पाठवला आहे, अशी माहिती तानाजी यादव यांनी तभाला दिली. शिवाय, पडोली-घुग्घुस मार्गावरील सर्व अनधिकृत कोळसा डेपोचे सर्वेक्षणही करणार असल्याची माहिती यादव यांनी सोमवारी दिली. जिल्ह्यात सध्या 20 पेक्षा जास्त कोळसा डेपो कार्यरत आहेत. या भागातील ग्रामस्थांना या सर्व कोळसा डेपोंमधून होणार्‍या प्रचंड प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. मात्र, त्यांच्यावर आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नव्हती.


batami 
 
कोळसा डेपोंचा कोळसा खंडित करू
चंद्रपूर-घुग्घूस मार्गावरील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी या अनधिकृत कोळसा डेपोंचा कोळसा पुरवठाच खंडित करण्याचे निर्देश राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले होते. त्याद्दष्टीने येत्या आठवड्यात या सर्व कोळसा डेपोंचे सर्वेक्षण केले जाईल. जिल्ह्यात केवळ दोन ते तीन कोळसा डेपोंना परवानगी आहे. उर्वरित डेपो जागा कमी दाखवून आमच्या नियमातून बगल घेतात, अशीही माहिती यादव यांनी दिली.