मुंबई,
ladki-bhaini-yojana : राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना ही योजना महिलांसाठी मोठा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात.
सध्या मात्र मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वेळेत न आल्याने अनेक लाभार्थी महिला चिंतेत आहेत. एप्रिल महिना संपायला काहीच दिवस शिल्लक असल्याने पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या चर्चा अशी आहे की, मार्च आणि एप्रिलचे दोन्ही हप्ते एकत्र जमा होऊ शकतात. त्यामुळे काहींना १५०० रुपये मिळतील, तर काहींना दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमके पैसे कधी आणि किती मिळणार, याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. महिनाअखेरीस थेट बँक खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने लाभार्थी महिलांचे लक्ष पुढील अधिकृत अपडेटकडे लागले आहे.