आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
मानोरा,
IPL betting raid Washim पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या पोहरादेवी - सिंगद रोडवरील किसनराव हायस्कूल समोर २५ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजून ३६ मिनिटांनी स्थानिक गुन्हे शाखा वाशीम पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल क्रिकेट सट्टावर धाड टाकली असता नगदी १ लाख ७ हजार यासह एकूण ६ लाख ६७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस कर्मचारी गजानन गोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी श्याम उर्फ गजनी पवार ( रा. शेंदोणा ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 

IPL betting raid Washim 
पोलिस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार मानोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोहरादेवी बीटमध्ये पोहरादेवी ते सिंगद रोडवरील किसनराव हायस्कूल समोरील रोडवर आयपीएल सट्टा सुरू असल्याचे स्थानिक पोलिस गुन्हे शाखा वाशीम यांना माहिती मिळाली. सदरील माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी एपीआय जगदीश बांगर यांनी आपल्या चमूसह घटनास्थळी धाड टाकली असता आरोपी श्याम उर्फ गजनी पवार ( रा. शेंदोणा ) यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये १ लक्ष ७ हजार रुपये नगदी रोख रक्कम, चार चाकी हुंडई आय - २० कंपनीची गाडी नंबर एमएच- ४१ एएस ४५५५ व व्हिओ कंपनीचा मोबाईल असा एकूण ६ लक्ष ६७ हजार रुपयाचा IPL betting raid Washim  मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४,५ महाराष्ट्र जुगार अधिनियम कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास एपीआय जगदीश बांगर हे करीत आहे.
आयपीएल सट्टा हा मानोरा शहरात मोठ्या प्रमाणात चालत असल्याची नागरिकात चर्चा होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस जिल्हा ठिकाणावरून मध्यरात्री हजर राहून छापा टाकून कारवाई केल्याने स्थानिक पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.