पुसद,
Krishi Sahitya Kendra राज्यातील विक्रेत्यांच्या कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील प्रलंबित अडचणीबाबत राज्याच्या कृषी विभागाकडून तातडीने निर्णयासाठी राज्यातील कृषी सेवा केंद्रचालकांचा 27 एप्रिलपासून बेमुदत कालावधीसाठी सर्व विक्री केंद्रे बंद आंदोलनात पुसद येथील विक्रेत्यांनी कृषी दुकाने बंद ठेऊन सहभाग नोंदवला.
माफदा संघटनेकडून कृषीमंत्री, राज्याचे प्रधान सचिव (कृषी), आयुक्त कृषी महाराष्ट्र व कृषी संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण पुणे यांच्याकडे मागील 4-5 वर्षांपासून कृषी विक्रेत्यांच्या अडचणी सोडवण्याबाबत मागणी करण्यात येत आहे. मात्र यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे पुढील राज्यातील कृषी सेवा केंद्रचालकांचा 27 एप्रिलपासून बेमुदत कालावधीसाठी बंद आंदोलनात पुसद येथील कृषी संचालकांनी देखील सहभाग नोंदवला आहे.
Krishi Sahitya Kendra विक्री केंद्राची तपासणी करणाèया अधिकाèयांची असलेली संख्या कमी करणे, प्रमाणित बियाण्यासंबंधी साथी पोर्टलचा वापराची विक्रेत्यावर सक्ती न करणे, परराज्यातून येणारी अवैध कीटकनाशके, तणनाशके व इतर कृषी साहित्य विक्री प्रतिबंधित होणे यासह इतर अटी मांडण्यात आल्या. या मागण्या मान्य होण्यासाठी 27 एप्रिलपासून राज्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रे बंद ठेवण्यात येणार असल्याचे आंदोलक कृषी संचालकांनी सांगितले.