जेवणानंतर अनर्थ; विषबाधेमुळे कुटुंब संपलं!

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
मुंबई,
family-ends-due-to-poisoning : मुंबईमधील पायधूनी परिसरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
 
mumbai
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाने शनिवारी रात्री नातेवाईकांसोबत जेवण केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वांना उलट्या, जुलाब आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडत गेल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आधी एका मुलीचा मृत्यू झाला, त्यानंतर काही वेळात दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. काही तासांतच आई-वडिलांनीही प्राण गमावले. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण काय आहे, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, नेमके काय घडले याचा शोध घेतला जात आहे.