Overrun petrol pumps छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अतिक्रमित स्वरूपात सुरू असलेल्या सारडा पेट्रोल पंपाला जिल्हाधिकाèयांनी दिलेल्या मुदतवाढीविरुद्ध सोमवार, 27 एप्रिल रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीच्या नेतृत्वात सर्वपक्षीय संघटना व शिवप्रेमींच्या सहभागाने हे आंदोलन करण्यात आले. सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. त्यानंतर कृउ बाजार समितीच्या प्रांगणातून सकाळी 11 वाजता भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा माहेश्वरी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महागाव मार्गावरून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला.
मोर्चादरम्यान ‘पेट्रोलपंप हटाव’ अशा जोरदार घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाèयांमार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पेट्रोलपंपाची मूळ परवानगी जुलै 2025 मध्ये संपुष्टात आली असताना त्यास मुदतवाढ देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा पेट्रोल पंप छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ असल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असून सार्वजनिक सोयी-सुविधांवरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. तसेच, संबंधित पेट्रोल पंप तत्काळ हटवून अन्य योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश द्यावेत, मुदतवाढ रद्द करावी व भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यासंदर्भात शिष्टमंडळाने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Overrun petrol pumps या आंदोलनात हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश आष्टीकर, माजी आमदार प्रकाश देवसरकर, माजी आमदार नामदेव ससाणे, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, माजी आमदार विजय खडसे, अॅड. संतोष जैन, कृष्णा पाटील, श्रीपाल आडे, चितांग कदम, दत्तराव शिंदे, प्रवीण मिराशे, अॅड. बाळासाहेब नाईक, भीमराव चंद्रवंशी, अरविंद भोयर, सतीश नाईक, अॅड. बळीराम मुटकुळे, बाळासाहेब चंद्रे, संदीप ठाकरे, रमेश चव्हाण, अभय पवार, राहुल मोहितवारसह पुतळा संघर्ष समितीचे पदाधिकारी, मराठा सेवा संघ, विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते. शहरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बंद यशस्वी ठरला. प्रशासनाने या प्रकरणात तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यावेळी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.