6,891 परीक्षार्थींनी दिली पाेलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
- 251 गैरहजर 100 उमेदवारांनी घेतला आक्षेप

अनिल कांबळे
नागपूर, 
Police Constable Exam नागपूर शहर पाेलिस आयुक्तालयांतर्गत रविवारी सकाळी 11 वाजता शहरातील 4 केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडली. पाेलिस भरतीसाठी घेतलेल्या शारीरिक चाचणीमध्ये तब्बल 7,142 परीक्षार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले हाेते. त्यातील 6,891 परीक्षाथींनी परीक्षा दिली. 251 परीक्षार्थी गैरहजर हाेते. सदर येथील रायसाेनी महाविद्यालय, काटाेल राेडवरील रामदेवबाबा विद्यापीठ, वर्धा राेडवरील तुळशीराम गायकवाड पाटील काॅलेज ऑफ इंजिनियरिंग अ‍ॅण्ड टेक्नाॅलाॅजी (टीजीपीसीईटी) आणि सेमिनरी हिल्स येथील एसएफएस महाविद्यालय येथील केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षा सकाळी 11 वाजता सुरू झाली.
 
 
reddky
 
परीक्षेदरम्यान ईलेक्ट्राॅनिक वस्तूंना साेबत ठेवण्यात सक्त मनाई करण्यात आली हाेती. परीक्षा संपल्यानंतर ज्या परीक्षार्थीला आक्षेप घ्यायचा हाेता, त्यासाठी 24 तासांचा अवधी देण्यात आला हाेता. यादरम्यान एकूण 100 परीक्षार्थींनी आक्षेप नाेंदविला. यावर येत्या काही दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या मार्च महिन्यांतच पाेलिस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी घेण्यात आली हाेती. त्या चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बाेलावण्यात आले हाेते. त्यांची रितसर यादी प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांचा लेखी परीक्षेसाठी विचार करण्यात आला हाेता.
 

po 
 
 
Police Constable Exam  पाेलिस शिपाई भरती लेखी परीक्षा अत्यंत पारदर्शकरित्या पार पडली. परीक्षेदरम्यान काेणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडला नाही. उमेदवारांनीही शिस्त दाखवून पाेलिस विभागाला सहकार्य केले.
 
- नविनचंद्र रेड्डी (पाेलिस आयुक्त)