आयुर्वेदिक महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
18 जणांवर कारवाईचा प्रस्ताव

यवतमाळ, 
Ragging in Ayurvedic college येथील डायाभाई मावजी मजीठिया आयुर्वेदिक महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा रॅगिंग झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 18 जणांवर कारवाईचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
 
 
r ekikd
 
यासंदर्भात यूजीसीच्या ‘अँटी रॅगिंग हेल्पलाइन’वर तक्रार प्राप्त झाल्यानंतर तत्काळ चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीदरम्यान प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून मानसिक तसेच शारीरिक त्रास दिल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने कठोर भूमिका घेत एका विद्यार्थ्याला एक वर्षासाठी निष्कासित करण्याचा निर्णय घेतला. आठ विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे. एकूण 18 जणांवर कारवाईची तलवार लटकली आहे.
 
 
Ragging in Ayurvedic college  या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत यवतमाळचे तहसीलदार योगेश देशमुख, अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य राजीव मुंदाणेसह विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश होता. रॅगिंग हा अत्यंत गंभीर व कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही. दोषींवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार योगेश देशमुख यांनी स्पष्ट केले.