बिस्किट कारखान्यात छापा

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
- 9 बालकामगारांची सुटका : बाल संरक्षण पथकाने तात्काळ छापा

अनिल कांबळे
नागपूर, 
Raid on the biscuit factory बुटीबाेरी औद्याेगिक वसाहत परिसरातील नारायणा बिस्कीट कारखान्यात अल्पवयीन मुलांना धाेकादायक परिस्थितीत कामासाठी ठेवण्यात आल्याची माहिती बाल संरक्षण पथकाला मिळाली. पथकाने कारखान्यावर छापा टाकत 4 मुली व 5 मुले अशी 9 बालकामगारांची सुटका केली. या प्रकरणी कारखान्याच्या संचालकांसह चाैघांविरुद्ध बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हे दाखल केले. या छाप्यामुळे कारखानदारांमध्ये खळबळ उडाली आली.
 
 
chhapa
 
Raid on the biscuit factory जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्या नेतृत्वातील पथकाने छापा घातला. या छाप्यादरम्यान अत्यंत धक्कादायक बाबी समाेर आल्या. फॅक्टरीत अल्पवयीन मुलांकडून अवजड, धाेकादायक मशीनवर काम करून घेतले जात हाेते. तसेच रसायनेयुक्त धाेकादायक वातावरणात काम केल्यामुळे त्यांच्या आराेग्यावर गंभीर परिणाम हाेण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. मुलांच्या राहण्याची व्यवस्था अत्यंत निकृष्ट व अस्वच्छ अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले. याशिवाय, बाहेर राज्य व बाहेर जिल्ह्यातील मुलांना आणून त्यांच्याकडून काम करून घेतले जात असल्याची बाब समाेर आली आहे. छाप्यादरम्यान काही मुलं बेपत्ता झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या प्रकरणी फॅक्टरीचे संचालक व इतर संबंधित चार जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई बुटीबाेरी पाेलिसांच्या सहकार्याने करण्यात आली.

12 तास करवून घेत हाेते काम
बालकामगारांकडून अक्षरश: वेठबिगाराप्रमाणे काम करवून घेतले जात हाेते. जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या पथकाने बालकामगारांना विचारणा केली असता त्यांच्याकडून दिवसाचे 12 तास काम करवून घेतले जात हाेते. त्यांना 12 हजार ते 15 हजार पगार दिला जात हाेता.