शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल
पुसद,
Rangrao Kale honored दर्यापूर येथे कन्याशाळा मैदानात पार पडलेल्या रोहिणी फाउंडेशन विद्यमाने आयोजित कार्यक्रमात विदर्भातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील पुसद येथील माजी शिक्षणाधिकारी रंगराव काळे यांना सन्मानित करण्यात आले. सिनेकलावंत मकरंद अनासपुरे व अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते विदर्भातील प्रतिष्ठितांना विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Rangrao Kale honored या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितात ज्येष्ठ संपादक सुधीर पाठक प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटक म्हणून दर्यापूर नगर परिषदच्या अध्यक्ष मंदाकिनी भारसाकळे व प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रा. नीलेश जळमकर, राष्ट्रनिर्माण प्रशासकीय अकादमीचे संचालक प्रा. गजानन कोरे, संत गाडगेबाबा मिशनचे संचालक गजानन देशमुख, ज्येष्ठ संपादक अमोल कंठाळे उपस्थित होते. याप्रसंगी विदर्भातील विविध क्षेत्रातील नामवंत तसेच विशेष कार्य करणारे दहा व्यक्तींना विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कंठाळे यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन धनंजय देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी आयोजन समितीचे सदस्य अमित अग्रवाल, सौरभ रहाटे, धनंजय देशमुख, अक्षय कळसकर, शुभम कंटाळे, समीक्षा चोरपगार व रोहिणी फाऊंडेशनचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.