वीज ट्रिपिंगच्या समस्येमागे प्रशासकीय अनियमितता कारणीभूत

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
- वीज पुरवठा अधिक मजबूत करण्यासाठी ठोस उपाययोजना
- महसूलमंत्री चंद्रशेखर

नागपूर 
वीज ट्रिपिंग प्रशासकीय अनियमिततेमुळे होत असून त्यात सुधारणा करण्यासाठी तातडीची पावले उचलली जात आहे. ऊर्जा विभाग या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत असून, वीज पुरवठा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात असल्याचे Revenue Minister Chandrashekhar Bawankule महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते पुढे राज्यातील वाढत्या वीज ट्रिपिंगच्या समस्येमागे प्रशासकीय अनियमितता कारणीभूत आहे. वायरमन, तांत्रिक विभाग, डेप्युटी इंजिनिअर तसेच एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर स्तरावर झालेल्या त्रुटींमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
Bawankule
 
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध असूनही वितरण व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ऊर्जा विभाग या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत असून, वीज पुरवठा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महावितरणच्या धोरणानुसार दिवसा सौर ऊर्जेतून तयार वीज वापरली जाते; मात्र रात्री त्या युनिट्सचे बँकिंग होत नसल्याने ग्राहकांवर बिलाचा भार येतो, त्यांनी सांगितले.
 
प्रतिमा उंचावण्यासाठी वडेट्टीवार यांचे वक्तव्य
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, भारताची संस्कृती आणि परंपरा समजून घेतली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल १४० कोटी भारतीयांच्या मनात आदर त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची तुलना डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. वडेट्टीवार हे असे वक्तव्य करून पक्षांतर्गत प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत असून राहुल गांधी यांची शाबासकी मिळवण्याचा त्यांचा हेतू असू शकतो, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.
कोणीही आक्षेपार्ह वक्तव्य करू नये
Revenue Minister Chandrashekhar Bawankule  धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, त्यांनी माफी मागितली असून भारतीय संस्कृतीनुसार माफी जाते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, असे सांगत त्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले. ‘चार मुलं’ या वक्तव्याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, त्या विधानामागील भावना समाजहिताची असून संकटकाळात स्वयंसेवक समाजाच्या मदतीसाठी पुढे येतात, अशी भूमिका त्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक कुटुंबातून किमान एक व्यक्ती समाजकार्याशी जोडली गेल्यास अधिक सक्षम होईल, अशी त्यामागील भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले. खत विक्रेत्यांच्या संपाबाबत शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून कृषी विभाग व प्रशासन लक्ष ठेवून आहे. लवकरच यावर तोडगा काढला जाईल. खताचा काळाबाजार होत असल्याचे दिसून आल्यास कठोर कारवाई केल्या जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच सर्व आमदार संबंधित दुकानांना देत परिस्थितीचा आढावा घेतल्या जात आहे. खरात प्रकरणात एसआयटी आपली बाजू न्यायालयात मांडणार आहे. संबंधितांनी सहकार्य केले नाही, तर ती बाबही कोर्टात मांडली जाईल. हे प्रकरण न्यायालयीन असल्याने अधिक भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.