रिसोड,
Gosanman Yatra अखिल भारतीय गो सम्मान अभियान अंतर्गत संपूर्ण भारत देशात २७ एप्रिल रोजी तहसीलदार मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशी गाईंचे संरक्षण करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
रिसोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी १० वाजता शुभम सरनाईक यांच्या सजवलेल्या देशी गाईसह गो सन्मान अभियान अंतर्गत गो सम्मान यात्रा काढण्यात आली व तहसील कार्यालय येथे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना २८८० गोभक्तांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशी गाईंचे संरक्षण होण्यासाठी गाईला राष्ट्रमाता चा दर्जा द्यावा, शालेय अभ्यासक्रमामध्ये गो विज्ञान हा विषय अनिवार्य करण्यात यावा, राज्य व राष्ट्रीय महामार्गावर गाईंचे अपघात होतात म्हणून गो अॅम्बुलन्स ठेवण्यात याव्यात, गाईंना चारा उपलब्ध होण्यासाठी चारा सुरक्षा कायदा करण्यात यावा, केंद्र सरकारने केंद्रीय गोसेवा व संरक्षण अधिनियम लागू करावा, गाईंची तस्करी व गोहत्या बंद होण्यासाठी कडक कायदा करून आजीवन कारावास ही शिक्षा देण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी नारायणी गोशाळा प्रकल्प मोरगव्हाणचे गजानन कोकाटे, छत्रपती गोशाळा बोरखेडी चे तुकाराम महाराज जायभाये, श्री सखाराम महाराज गोरक्षण प्रतिष्ठानचे प्रतिनिधी प्रा. दीपक जोशी, प्रा. स्वप्निल साकळे, सद्गुरु दत्त गोरक्षण व वन्य औषधी संस्था कवठाचे वीरेंद्र सरनाईक, निवृत्ती पाटील, डॉ. अशोक इंगोले, जयंत वसमतकर, दिगंबर भिते, शितल पांडे, स्नेहा लोथे, भावना भिते, लता ईरतकर, नंदू मगर, विजय खडसे, समाधान छत्रे, भीमा माळेकर, नंदू देशमुख, निलेश जैन, महादेव पावडे, प्रज्वल सरनाईक, रितेश सरनाईक, अनिल सोनुने,शरद सरनाईक,रमेश रोडे, सुनील अल्लाट, आबाराव सरनाईक,घनश्याम फडतडे, प्रितेश सरनाईक, महादेव देशमुख,गोपाल सरनाईक,अभिषेक सरनाईक,सागर महाराज शांडिले,गजानन मुलंगे, अजबराव देशमुख यांच्यासह शेकडो गो भक्त उपस्थित होते.