संत गुलाब बाबांबद्दल आक्षेपार्ह विधान

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
श्याम मानव यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी
 
नागपूर 
Sant Gulab Baba संत गुलाब बाबा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करून भाविकांच्या भावना दुखावल्या प्रकरणी श्याम मानव यांच्यावर फौजदारी दाखल करण्याची मागणी गुलाब बाबा सेवाश्रमच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात सेवाश्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर आदमने यांच्या नेतृत्वात भाविकांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
 
 
gulab-baba
 
Sant Gulab Baba  या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेले श्रीकांत शिवणकर यांनी डीसीपी राहुल मदने यांच्याकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मानव यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी वडालकर, चंदू दंदे, अविनाश नाईक, सेवाश्रमाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. संतांची निंदा कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. जर प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.