रेल्वेगाड्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
आमला रेल्वेस्थानकावर पाणी प्रकल्प
 
नागपूर 
Severe water shortage in railway trains मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना पाणी भरण्यासाठी अतिरिक्त वेळ घ्यावा लागतो. यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होत असून विलंबाचे प्रमाण वाढत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने नागपूर-दिल्ली मार्गावरील आमला येथे वॉटर प्लांट उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. नागपूर स्थानकावरील वाढता ताण लक्षात घेता पर्यायी पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक झाले असून आमला येथे पाणी प्रकल्प सुरू झाल्यास गाड्यांमधील पाणीपुरवठा सुधारेल, अशी अपेक्षा मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी व्यक्त केली आहे.
 
 
amala
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये पाण्याची समस्या
Severe water shortage in railway trains  उन्हाळयात नागपूर मार्गे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते. विशेषतः स्लिपर डब्यांतील शौचालयांची अवस्था गंभीर होत असल्यामुळे रेल्वेने प्रवाशांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आमला रेल्वेस्थानकावर पाणी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नागपूर मार्गे धावणार्‍या दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये पाण्याची कमतरता निर्माण स्लिपर डब्यांतील स्वच्छतागृहांची स्थिती सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने पर्यायी सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.