बुलढाणा,
Students take exams in the scorching sun जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट सुरू असून तापमानाने ४३.५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. अशा कडक उन्हात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (दि.२६) घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसह पालकांची अक्षरशः परीक्षाच झाली.
Students take exams in the scorching sun जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांत सकाळपासूनच विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळाली. एकीकडे उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे वाहतुकीचा खोळंबा यामुळे अनेक ठिकाणी पालक व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. शहरातील सहकार विद्या मंदिर येथील परीक्षा केंद्राबाहेर संध्याकाळच्या सुमारास सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. यामले विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अहवालानुसार, इयत्ता चौथीसाठी एकूण १८,५३९ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी सुमारे १७,७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून अनुपस्थितीचे प्रमाण कमी राहिले. तसेच इयत्ता सातवीसाठी १३,६३५ विद्यार्थ्यांपैकी १२,८०० पेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने परीक्षेचे नियोजन सुरळीत पार पडल्याची माहिती देण्यात आली. परीक्षा केंद्रांत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.