सुरत,
Surat murder case गुजरातच्या सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मेरठमधील निळा ड्रम हत्याकांडासारखीच घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह एका लाकडी पेटीत लपवून ती सिमेंटने भरली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. विशाल साळवे, असे आरोपीचे तर शिल्पा साळवे, असे मृत पत्नीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शिल्पा ही एक आहारतज्ज्ञ होती. ती चार दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा तपास सुरू केला. मात्र, तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच या प्रकरणाला अचानक वेगळे वळण लागले. साळवेच्या घरात एक हस्तलिखित चिठ्ठी सापडली. ही चिठ्ठी विशालने लिहिली होती. त्यांच्या अल्पवयीन मुलाला ही चिठ्ठी सापडली आणि त्याने ती पोलिसांना दिली. त्या चिठ्ठीत लिहिले होते की, त्याच्याकडून एक मोठी चूक झाली आहे. शिल्पा आता हयात नाही.
लाकडी पेटीतून येत होती दुर्गंधी
संशयाच्या आधारे Surat murder case पोलिसांनी तपासाला गती दिली असता त्यांना विशालशी संबंधित एक जुनी, रिकामी मालमत्ता सापडली. ही मालमत्ता सलाबतपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत होती. पोलिसांनी घराचे कुलूप उघडले असता खोलीच्या कोपèयात एका लाकडी पेटीतून तीव्र दुर्गंधी येत होती. पेटी उघडली असता त्यात महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला. तो कच्च्या सिमेंटने झाकून लपवण्यात आला होता. महिलेची हत्या चार ते पाच दिवसांपूर्वी झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक नित्कर्ष आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करुन पुढील तपास सुरु केला आहे.