रियाजोद्दीन व वसीम अटकेत
अमरावती,
trap by hypocrisy एका ३५ वर्षीय महिलेच्या असहायतेचा फायदा घेता भोंदूगिरीने तिला जाळ्यात ओढले. तुटलेले लग्न पुन्हा जोडून देतो, असे सांगून महिलेची फसवणूक करण्यात आली व तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
रियाजोद्दीन (४५) आणि वसीम (३२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील पीडित महिलेचे सुमारे वर्षभरापूर्वी लग्न तुटले. trap by hypocrisy ज्या तरुणाशी तिचे लग्न ठरले होते, त्याने तिचा मोबाईल क्रमांक ब्लॅक लिस्टमध्ये टाकला होता. यामुळे पीडित महिला मानसिक तणावात होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ही महिला रस्त्याने जात असताना तिची ओळख रियाजोद्दीन नावाच्या व्यक्तीशी झाली. महिलेने त्याच्या मोबाईलवरून लग्न तूटलेल्या तरुणासोबत संपर्क साधला. यावेळी रियाजोद्दीनने महिलेची सर्व परिस्थिती जाणून घेतली आणि तिच्या असहायतेचा फायदा घेण्याचे ठरवले.
त्याने महिलेला विश्वास दिला की, त्याच्या परिचयातील वसीम नामक व्यक्तीकडून विशेष पूजा करून घेतल्यास तिचे तुटलेले लग्न पुन्हा जुळेल आणि सर्व अडचण दूर होईल. यानंतर त्याने वसीमला महिलेकडे पाठवले. वसीमने या पूजेच्या नावाखाली महिलेकडून २५ ते ३० हजार रुपये उकळले. दरम्यानच्या काळात रियाजोद्दीनचे महिलेच्या घरी येणे-जाणे वाढवले आणि तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. trap by hypocrisy दरम्यान आरोपीचा त्रास असह्य झाल्याने अखेर पीडित महिलेने नांदगाव पेठ पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुध्द बलात्कार आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.