चंद्रपूर,
Water level of Ramala Lake has decreased चंद्रपूर महानगराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक रामाळा तलावाची पाण्याची पातळी तीव्र उष्णतेमुळे घटली आहे. त्यामुळे हजारो मासोळ्यांचाही मृत्यू झाल्याची तक्रार मच्छिमार संस्थांकडून होत आहे. तीव्र तापमानामुळे ‘वॉटर हिट’ची स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि पर्यावरणप्रेमींनी तलावामध्ये झाडांची पाने टाकण्याची मोहिम सुरू केली आहे. पाण्याचे तापमान कमी करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. चंद्रपूरचा पारा 45 अंशाच्यावर गेला आहे.
Water level of Ramala Lake has decreased दुपारी 12 ते 4 वाजताच्या सुमारास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात येत असून, 26 व 27 ला उष्णेताचा येलो अर्लटही जारी करण्यात आला होता. रामाळा तलावालाही या तीव्र तापमानाचा फटका बसला आहे. सोबत परिसरातील सांडपाणी सातत्याने या तलावात येते आणि त्यामुळेही मासोळ्यांवरही परिणाम होतो. या दोन्ही कारणांनी मासोळ्या मरण पावल्याचे सांगितले जात असून, त्यावर उपाययोजना म्हणून चंद्रपुरातील मच्छीमार सोसायटीने परिसरातील तलावात येणारे सांडपाणी थांबवण्याची विनंती केली आहे. पर्यावरणप्रेमींनी मोठ्या प्रमाणात तलावामध्ये झाडांची पाने टाकली असून, त्यामुळे सावली तयार होईल आणि मासोळ्यांना लपण्यासाठी एक जागा मिळेल असा युक्तीवाद आहे. दरम्यान, सावरकर नगर परिसरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम 90 टक्के आणि संरक्षक भिंतीचे काम 80 टक्के पूर्ण झाल्याचे प्रशासन सांगत असले, तरी प्रत्यक्षात तलावात दूषित पाणी मिसळणे सुरूच आहे. 30 कोटी रुपये खर्च होऊनही जर तलाव प्रदूषणमुक्त होत नसेल, तर या निधीचा विनियोग नेमका कुठे झाला? हा प्रश्न खा. धानोरकर यांनी यापूर्वीच जिल्हा प्रशासनाला विचारला आहे.
चंद्रपूर 45.2 अंश सेल्सिअसवर
अवघ्या विदर्भात उष्णतेची लाट आहे. कायम उष्ण असणार्या चंद्रपूर शहरालाचेही तापमान वाढले असून, तप्त झळा बसत आहेत. चंद्रपूरचे सोमवारचे तापमान 45.2 अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. तर ब्रम्हपुरी 43.4 अंश सेल्सिअस एवढे आहे.