नवी दिल्ली
Aadhaar card आधार कार्डबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरणाने (यूआयडीएआय) एक परिपत्रक जारी करून स्पष्ट केले आहे की आधार कार्डला आता जन्मदिनाचा पुरावा मानले जाऊ नये. आधार कार्डवरून तुमची ओळख सिद्ध होऊ शकते, परंतु तुमच्या जन्माची तारीख नाही.
Aadhaar card यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे की आधार कार्ड हे ‘ऑथेंटिकेशन’द्वारे ओळखीचा वैध पुरावा आहे. परंतु त्यात जन्माची तारीख नमूद असली तरीही त्याला जन्मतारखेचा पुरावा मानू नये. यूआयडीएआयने ही माहिती आधार युजर्स एजन्सी आणि ई-केवायसी युजर्स एजन्सी यांना पाठवलेल्या पत्रात दिली आहे.
आधार कार्ड जन्मदिनाचा पुरावा का नाही?
Aadhaar card यूआयडीएआयनुसार, आधारचा मुख्य उद्देश ‘ऑथेंटिकेशन’च्या माध्यमातून व्यक्तीची ओळख प्रस्थापित करणे हा आहे, त्या व्यक्तीची जन्मतारीख सांगणे हा नाही.