बीडमध्ये अपघात; खासदारांच्या कारला धडक

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
बीड,
accident-in-beed : बीडमध्ये एक अपघाताची घटना घडली असून खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला दुचाकीची धडक बसल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ते बीडहून केजकडे जात असताना मस्साजोग बसस्थानकाजवळ घडली.
 
 

sonavane 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, खासदारांचा ताफा काही वेळासाठी थांबला असताना अचानक दुचाकीने त्यांच्या कारला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
या घटनेत खासदारांना कोणतीही दुखापत झाली नसली तरी त्यांच्या कारचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आणि काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.