मद्यधुंद चार दुचाकी चालकांवर कारवाई

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
action-against-drunk-drivers : मद्यधुंद वाहन चालकांवर धडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी आपल्या सहकार्‍यांना दिल्या. दरम्यान, वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी ४ मद्यधुंद वाहन चालकांवर धडक कारवाई केली.
 
 
kl
 
 
 
वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करून कुणी वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित नाही याची शहानिशा केली. याच मोहिमेत प्रशांत सहारे (४५) रा. पुलफैल, हरिचंद्र कौराती (५६) रा. आकरे ले-आऊट सिंदी मेघे, स्वप्निल गांजरे (३७) रा. गजानननगर्र, सुरेश ठाकरे (४७) रा. धंतोली चौक वर्धा हे वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई मुकेश राऊत, रियाज खान, शबीर सैय्यद, अनिल तिवारी, प्रदीप कोवळे, दिलीप कामडी यांनी केली.