अमरावती,
amravati-university-service-award : अमरावती विद्यापीठाचे या वर्षीचे उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्र दिनी १ मे, २०२६ रोजी विद्यापीठ परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृहामध्ये कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
महाविद्यालयीन स्तरावर उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील सर्वसाधारण वर्गवारीत प्राचार्यामधून इंदिरा महाविद्यालय, कळंबचे प्राचार्य डॉ. पवन मांडवकर, संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक सर्वसाधारण वर्गवारीत गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदूरबाजार येथील प्राध्यापक तथा रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. नंदकिशोर गव्हाळे, महिला राखीव वर्गवारीत शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथील प्राध्यापक तथा प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयश्री धोटे, संलग्नित महाविद्यालयांतील सर्व स्तरावरील शिक्षकेतर सर्वसाधारण वर्गवारीत कर्मचार्यांमधून इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय, अमरावती येथील अधीक्षक प्रशांत देशमुख यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहेत.
विद्यापीठ स्तरावर विद्यापीठ महिला राखीव वर्गवारीत शिक्षकांमधून गृहविज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. संयोगिता विलास देशमुख, विद्यापीठ प्रथम श्रेणी सर्वसाधारण वर्गवारीत अधिकार्यांमधून परीक्षा विभागातील सहाय्यक कुलसचिव मिलींद देशपांडे, विद्यापीठ प्रथम श्रेणी महिला राखीव वर्गवारीत अधिकार्यांमधून महाविद्यालयीन विभागातील सहाय्यक कुलसचिव डॉ. साक्षी ठाकूर, विद्यापीठ द्वितीय श्रेणी सर्वसाधारण वर्गवारीत अधिकार्यांमधून आस्थापना विभागातील अधीक्षक अमोल म्हैसाळकर, व्दितीय श्रेणी महिला राखीव वर्गवारीत अधिकार्यांमधून परीक्षा विभागातील अधीक्षक स्मिता म्हैसाळकर, विद्यापीठ तृतीय श्रेणी सर्वसाधारण वर्गवारीत कर्मचार्यांमधून वित्त विभागातील वरिष्ठ सहाय्यक संजय कोकाटे, तृतीय श्रेणी महिला राखीव वर्गवारीत कर्मचार्यांमधून ग्रंथालय सहाय्यक ज्योती गेडाम, तसेच विद्यापीठ चतुर्थ श्रेणी सर्वसाधारण वर्गवारीत कर्मचार्यांमधून सामान्य प्रशासन विभागातील चौकीदार मोरेश्वर मुंजाळे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रमात विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधून बीएसपी महाविद्यालय परतवाडा, जि. अमरावती या महाविद्यालयाची ‘एन.ई.पी. स्कूल कनेक्ट’ या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.