अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन
ग्रामवासींनी दिले गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
मारेगाव,
Bhalewadi: Drinking water system तालुक्यातील भालेवाडी येथे पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून द्यावी, समाज बांधवांसाठी असलेले चावडीचे काम त्वरित सुरू करावे, तसेच सरोदी पोड येथेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी, अन्यथा पंचायत समितीसमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा भालेवाडी व सरोदी पोड येथील नागरिकांनी गटविकास अधिकाèयांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. लेवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी तसेच पाईपलाईन इत्यादी कामे करावयाची होती. या कामाला ठेकेदाराने सुरवात केली. परंतु काम अर्धवट ठेवून बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट होत आहे.
Bhalewadi: Drinking water system आता उन्हाळा सुरू असून तीव्र उन्हाने शरीराची लाहीलाही होत आहे. पाण्याची पातळी खाली जात आहे. अशातच अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. यात ज्या गावात जलजीवन मिशनअंतर्गत पिण्याच्या पाण्याची कामे करण्यात येत आहेत तीही अर्धवट आहेत. त्यामुळे ‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ अशी बिकट अवस्था तालुक्यातील अनेक गावांची आहे. गावात असलेले चावडीचे काम त्वरित करण्यात यावे व सरोदी पोड येथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित करण्यात यावी अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा गटविकास अधिकाèयांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. यावेळी हुसेन ढोबरे, अंकुश माफूर, सुधाकर आत्राम, सोनू खडसे, रवींद्र टेकाम, संतोष आत्राम, अशोक आत्राम, गोसाई माफूर, भीमराव जांभुळकर, संदेश माफूर, अनिकेत माफूर यांच्यासहित अनेक नागरिक उपस्थित होते.