सखे सोबतीच्या रक्तदान शिबिरात २३२ बॅग संकलन

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Blood donation camp उन्हाळ्याच्या दिवसात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा लक्षात घेऊन आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सखे सोबती फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने छडी आणि किशोर चरडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयएमए सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याला नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत एकूण २३२ रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले. डॉ. पुरुषोत्तम पुरी यांनी रक्तदानाचे महत्व पटवून दिले. या शिबिराला खा.माया इवनाते, पराग सराफ, धनंजय बापट, बनवारीलाल पुरोहित तसेच रा.स्व.संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
blaoodkd
 
Blood donation camp या जीएमसी १९८६ बॅच, विदर्भ असोसिएशन ऑफ पॅथालॉजी अँड मायक्रोबायोलॉजी, कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, विदर्भ चॅप्टर आणि असोसिएशन ऑफ सर्जन्स, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ४५ डिग्रीपेक्षा जास्त तापमान असूनही रक्तदात्यांनी उत्साह कायम ठेवला होता. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रक्तपेढी, लाईफ लाईन रक्तपेढी तसेच दत्तात्रय रक्तपेढी यांनी संकलनाचे कार्य केले. फाऊंडेशनचे अध्यक्ष महेंद्र मुलकलवार यांनी प्रास्ताविक केले. सखे सोबती फाऊंडेशनतर्फे १२५ वेळा रक्तदान करणारे डॉ. संजय देवतळे यांचा तसेच नियमित रक्तदाते डॉ. अंजली भांडारकर व डॉ. अंजुषा पांडवकर यांचा देखील सत्कार करण्यात आला. शिबिर यशस्वितेसाठी डॉ.दीपक साने, नरेंद्र निमजे, प्रवीण पांडवकर, डॉ.रेणुका यावलकर, डॉ. तुलसी छाडी परिश्रम घेतले.