बोगस शिक्षक भरतीत होणार कोठा व कळंबच्या संस्थांची चौकशी

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल

कळंब,
Bogus teacher recruitment शिक्षक भरती करिता असलेल्या पवित्र पोर्टलला डावलून कळंब तालुक्यातील काही शिक्षणसंस्थांनी चार शिक्षकांची भरती केली होती. त्या अनुषंगाने ‘तरुण भारत’ने वृत्तसुद्धा प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल चौकशी समितीने घेतली असून कळंब तालुक्यात राजकीय धनाढ्य व शक्तीसंपन्न संस्थेच्या दोन्ही शाळांना चौकशी समितीची नोटीस प्राप्त झाली. त्यांना बुधवार, 29 एप्रिल रोजी अमरावतीला संपूर्ण दप्तर घेऊन चौकशीसाठी बोलवल्याची माहिती आहे.
 
 
bogas
 
त्यामुळे कळंब तालुक्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात बोगस भरती पवित्र पोर्टलला टाळून ‘अपवित्र’ भरती करण्यात आली होती. त्या अपवित्रतेचा भांडा आता फुटण्याची दाट शक्यता असल्याने कळंब तालुक्यातील शिक्षण संस्था चालकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे या चौकशी समितीने निश्चितच गंभीरपणे चौकशी केल्यास कळंब तालुक्यामध्ये असलेल्या धनाड्य व शक्तीसंपन्न अशा या संस्थेचा भंडाफोड होणार हे निश्चित असल्याने, ज्यांनी मोठी माया देऊन पदभरती निश्चित केली असे आणि ज्यांनी या धनसंपदेचा लाभ घेतला, असे दोन्ही धनाढ्य कचाट्यात सापडण्याची दाट शक्यता आहे.
 
 
 
Bogus teacher recruitment त्यामुळे कळंबच्या राजकीय तथा शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. येणाèया 29 एप्रिलनंतर कळंब शहरामध्ये या बोगस भरतीचा भंडाफोड झाल्यास नवल वाटू नये. ‘तरुण भारत’ने यवतमाळ शिक्षणाधिकारी तथा अमरावती मंडळ येथे संपर्क साधला असता या घडामोडींना दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे या संस्थांवर कारवाई होणे निश्चितच दिसत आहे.