बुलडाणा,
om-jadhav : येथील सायकलिंग लबचे सदस्य ओम जाधव यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात बुलडाणा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मानाची नोंद मिळवली आहे. सायकलिस्ट म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद करण्यात आली. यासाठी त्यांना मानाचे मेडलही प्रदान करण्यात आले.हे मेडल बुलडाणा सायकलिंग लबचे मार्गदर्शक व बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
ओम जाधव यांनी जून २०२५ मध्ये सायकलिंगची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांनी नियमित सराव करत बुलडाणा सायकलिंग लबतर्फे आयोजित बुलडाणा ते पंढरपूर वारीत सहभाग घेतला आणि ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या वारीतून प्रेरणा घेऊन त्यांनी सायकलिंगमध्ये अधिक प्रगती करण्याचा निर्धार केला.केवळ १९ व्या वर्षी त्यांनी खडतर अशा स्पर्धांमध्ये सहभागी होत आपली क्षमता सिद्ध केली. त्यांनी २०० किमी, ३०० किमी, ४०० किमी आणि ६०० किमी असे सर्व टप्पे निश्चित वेळेत पूर्ण करत एस आर ही मानाची पदवी मिळवली. विशेष म्हणजे त्यांनी ६०० किमी अंतर दोन वेळा यशस्वीरित्या पूर्ण करून आपली जिद्द दाखवून दिली.त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत, महाराष्ट्रातून सर्वात कमी वयात पदवी मिळवणारा सायकलिस्ट म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद करण्यात आली. यासाठी त्यांना मानाचे मेडलही प्रदान करण्यात आले.हे मेडल बुलडाणा सायकलिंग लबचे मार्गदर्शक व बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या यशाचे श्रेय ओम जाधव यांनी आपले मार्गदर्शक व लबचे अध्यक्ष दीपक यावल, सरदारसिंग ठाकूर, विष्णू भगवान गाढे,संजय मयुरे , कैलास जैस्वाल तसेच लबमधील सर्व सदस्य यांना दिले आहे. तसेच या प्रवासात खंबीरपणे साथ देणार्या त्यांच्या कुटुंबीयांचेही त्यांनी आभार मानले.