बुलढाणा अर्बनच्या अयोध्या भक्तनिवासचे थाटात उद्धघाटन

गंगा नदी आरती प्रमाणेच शरयु नदी आरतीची सुरु केली परंपरा

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
बुलढाणा,
ayodhya bhaktan niwas inaugurated बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्या वतीने मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या उत्तर प्रदेश येथे भक्तनिवास व भोजनालयाचे उ‌द्घाटन नुकतेच पार पडले. या भक्तनिवासचे उ‌द्घाटन बुलडाणा अर्बन चॅरीटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ. कोमलताई सुकेश झंवर यांचे शुभहस्ते व बुलडाण्याचे विधान परिषद सदस्य आमदार धीरज लिंगाडे व इतर मान्यवरांसह बुलडाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांचे उपस्थितीत पार पडले..
 
 
ayodhya bhaktan niwas inaugurated
 
 
बुलढाणा अर्बन संस्था ही सामाजीक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असुन संस्थेच्या ग्राहक सभासदांना बँकींग सेवेसोबतच सामाजिक व धार्मिक सेवा सुविधा पुरविण्यात अग्रेसर असते. संस्थेने नुकतेच अयोध्या येथे ४८ ए.सी रुम्सचे भक्तनिवास व भोजनालयाचा शुभारंभ करण्यात आला. या भक्तनिवासचे उद्‌घाटन बुलढाणा अर्बन चॅरीटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ. कोमलताई सुकेश झंवर यांचे हस्ते व बुलढाण्याचे विधान परिषद सदस्य आमदार श्री.धीरज लिंगाडे, ॲड.गणेश पाटील, बुलढाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा श्री. राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, उपाध्यक्ष विनोद केडीया तसेच संस्थेचे संचालक डॉ. किशोर केला, नंदकिशोर बाहेती, डॉ. विनोद भंडारी, कांतीलाल छाजेड, अंबेश बियाणी, नंदकिशोर झंवर, दिनेश गांधी,अजय सेंगर तसेच संस्थेचे सनदी लेखापाल सचिन वैद्य, विनोद गांधी आदीच्या उपस्थितीत पार पडले..
 
या भक्तनिवासचे शुभारंभाची सुरवात शरयु नदीच्या आरतीने करण्यात आली. दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता नया घाट येथे स्थानिक अकरा पंडीतांचे मार्गदर्शनात विधीवत संकल्प करुन शरयु नदीची आरती करण्यात आली या प्रसंगी निमंत्रीत १५० भक्तांच्या हस्ते शरयु नदीची आरती करण्यात आली, तर दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता पंडीत सुमधुर शास्त्री व पंडीत श्री. राम तिवारी यांच्या मधुरवाणीत सुंदरकांड आयोजीत करण्यात आले त्यानंतर रामनामाचे संकीर्तन करण्यात आले व त्यानंतर बुलढाणा अर्बन चॅरीटेबल सोसाययटी च्या अध्यक्षा सौ. कोमलताई सुकेश झंवर याचेहस्ते भक्तनिवासचे रितसर उ‌द्घाटन करण्यात आले.ayodhya bhaktan niwas inaugurated या भक्तनिवासचे निवासी बुकींग संस्थेच्या सर्व शाखांमधुन करता येणार असल्याने भाविकभक्तांनी संस्थेच्या या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन बुलढाणा अर्बन संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी केले आहे. या कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक,विभागीय व्यवस्थापक, कर्मचारी तसेच स्थानीक प्रतिष्ठीत व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.