बर्निंग ट्रकचा थरार..!

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
बॅटरी स्फोटाने ट्रक जळून खाक

दिग्रस, 
'Burning Truck' दिग्रस दारव्हा महामार्गावरील गांधीनगर फाट्याजवळ एका धावत्या ट्रकच्या बॅटरीचा स्फोट झाला. यात ट्रक जळून खाक झाला. हा ‘बर्निंग ट्रक’चा थरार शनिवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारस घडला. यवतमाळ येथून दारव्हा मार्गे दिग्रसकडे येत असलेला ट्रक एमएच34 एव्ही0758 गांधीनगर फाट्याजवळ पोहोचताच ट्रकमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत ट्रकला आपल्या कवेत घेतले.
 
 
trak
(संग्रहित छायाचित्र ) 
 
'Burning Truck'  या घटनेत ट्रकचे चालक म. साकीब म. शकील हे थोडक्यात बचावले. मात्र आगीच्या झळांमुळे त्यांच्या डोक्यावरील केस जळले. प्रसंगावधान राखत त्यांनी तत्काळ ट्रक थांबवून आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधत पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत ट्रक पूर्णतः जळून खाक झाला होता. सहायक पोलिस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी डॉ. तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक महेश देशमुख, राम राठोड, सुनील पवार यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले होते.