कॅटरिंग व्यावसायिकांची नपवर धडक

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
वर्धा,
wardha municipality खरकटे अन्न, डिस्पोजलच्या विल्हेवाटीसाठी पर्यायी व्यवस्था करून द्या, या प्रमुख मागणीसाठी कॅटरिंग व्यावसायिकांनी वर्धा नगरपालिकेवर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांना देण्यात आले.
 
 
 
कॅटरिंग व्यावसायिकांची नपवर धडक
 
वर्धेतील सर्व लॉन व हॉल या ठिकाणी लग्न, स्वागत सोहळा आदी कार्यक्रम होतात. सध्या लग्नसराईचे दिवस आहे. संबंधित विविध सोहळे पार पडल्यावर कॅटरिंग व्यावसायिकांसमोर खरकटे अन्न व डिस्पोजलच्या कचर्‍यांची योग्य विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या उभी आहे. शिवाय हा कचरा टाकण्यासाठी वर्धेत कोणतीही जागा उपलब्ध नाही.wardha municipality रस्त्याच्या कडेला हा कचरा टाकल्यास विद्रुपीकरणात भर पडते. त्यामुळे लवकरात लवकर जिल्ह्यातील कॅटरिंग मालकांना अन्न व डिस्पोजलची विल्हेवाट लावण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी किंवा कचरा गोळा करणार्‍या गाडीत हा कचरा टाकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कॅटरिंग व्यावसायिकांची आहे. यावेळी अक्षय मानकर, तनय खंगार, आनंद राठी, लोकेश जैन, आदित्य कोकडवार, मोहन मिसाळ, जगदीश जोशी, आशिष अग्रवाल, गजू कराळे, रमेश टिपले, योगेश रणनवरे, महेश गावंडे, आदींची उपस्थिती होती.