दारव्हा,
पालकमंत्री संजय राठोड यांच्या वतीने Chaitanya Group of Sports चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्टद्वारा आयोजित अखिल भारतीय फुटबॉल सामन्यांचे उद्घाटन मंगळवार, 27 फेब्रुवारीला स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर झाले. हे सामने संध्याकाळी 7 ते 10 च्या दरम्यान खेळल्या जात असून उद्घाटनप्रसंगी दारव्हेकरांनी मोठी हजेरी लावली. या सामन्याकरिता महाराष्ट्रच नव्हे तर विदर्भातील बहुसंख्य भागातून खेळाडूंचा सहभाग आहे. दारव्हा शहरात हे सामने गेल्या दहा वर्षांपासून पुन्हा नव्याने सुरू झालेले असून यामध्ये पालकमंत्री संजय राठोड यांचा सिंहाचा वाटा आहे.

मंगळवार, 27 एप्रिलला या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असून या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून नगर परिषद अध्यक्ष सुनील चिरडे, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, ठाणेदार शिवप्रकाश मुळे, शिवसेना शहरप्रमुख राजू दुधे, आरोग्य सभापती एकनाथ माहुरकर, बांधकाम सभापती प्रकाश दुधे, शिक्षण सभापती वैशाली खाटीक, चेतन करोडदेव, घनश्याम नगराळे, बाजार समिती सभापती सुभाष राठोड, समन्वय समिती अध्यक्ष सुशील राठोड, जिल्हा फुटबॉल संघटना सचिव सुशील दीक्षित, ज्वालाक्रांती मित्रमंडळ अध्यक्ष अमोल राठोड, माजी प्राचार्य सुरेश निमकर, डॉ. रूपेश खंदाडे, नगरसेवक विशाखा बिहाडे, कविता शिले, साक्षी मते, प्रा. किशोर राठोड, चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्टचे अध्यक्ष डॉ. गोपाल अग्रवाल, मार्गदर्शक गणेश भोयर, उपाध्यक्ष अनिल लाभसेटवार, पोलिस उपनिरीक्षक कायंदे, कार्याध्यक्ष सुभाष खाटीक, क्रीडा प्रशिक्षक चिंतामणी नवरंगे, उपशहरप्रमुख आनंद झोळ हे मान्यवर उपस्थित होते .
Chaitanya Group of Sports सर्वप्रथम पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले व मैदानावर जाऊन दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या. हा उद्घाटन सामना फुटबॉल संघ वाघापूर व चैतन्य ग्रुप ब गट यांच्यात झाला असून यामध्ये वाघापूरचा फुटबॉल संघ विजयी झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चैतन्यचे मार्गदर्शक गणेश भोयर यांनी, अध्यक्षीय भाषण नप अध्यक्ष सुनील चिरडे यांनी केले असून ठाणेदार शिवप्रकाश मुळे व सुरेश निमकर यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. श्रीपतवार संगीत संघ यांनी स्वागतगीतातून खेळाडू व पाहुण्यांचे स्वागत केले.
बुधवार, 29 एप्रिलला विदर्भातील नामांकित संघ वर्धा जिल्हा फुटबॉल संघ विरुद्ध अमरावती युनायटेड फुटबॉल संघ यांच्या दरम्यान सामना होणार आहे. तसेच दुसरा सामना वाघापूर फुटबॉल संघ विरुद्ध अमरावती इंडिपेंडन्ट अकॅडमी यामध्ये होणार आहे . या कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे सचिव ओंकार निमकर व आभारप्रदर्शन क्रीडा शिक्षक श्याम पांडे यांनी केले. या सामन्यांकरिता राजू भोयर, गोपाळ भोयर, अश्फाक, सूरज तुमसरे, महादेव उरकुडे, किसन जौजारे, अभिजित बेलपत्रे, राम मते, रोहन शिंगणजुडे, कसंबे, गणेश दुबे, राजेश केदार, पांडुरंग भोयर, कुणाल राठोड, सिद्धार्थ भोयर, मिलींद पांडे, वहीदखान, महेश भोयर, सादिक शेख, नासीर शेख, सुदर्शन भितकर, रमेश गुडदे, गफूर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .