मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ठरत आहे ‘आधार’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती
यवतमाळ,
शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. यवतमाळ जिल्ह्यात आर्थिक वर्षात 287 रुग्णांना 2 कोटी 38 लाख 52 हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे यात सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रुग्णालय, धर्मादाय रुग्णालय, संस्था, दाते यांचे सहकार्य लाभत आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा व मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे. कॉक्लियर इम्प्लांट (वय 2 ते 6), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, कर्करोग (केमोथेरपी/रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण 20 गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
CM Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार असून गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून यवतमाळ जिल्ह्यातील 287 गरजू रुग्णांना 2.38 कोटींपेक्षा अधिकची वैद्यकीय मदत करण्यात आल्याने, ही योजना अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे. जलद, पारदर्शक व संवेदनशील कार्यपद्धतीमुळे पात्र रुग्णांना वेळेत उपचारासाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. गरजूंनी 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
राज्यात 40,776 रुग्ण : 333.06 कोटी मदत
1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यातील तब्बल 40 हजार 776 रुग्णांना 333 कोटी 6 लाख 81 हजार 500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत यवतमाळ जिल्ह्यातील 287 रुग्णांना 2 कोटी 38 लाख 52 हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.