अनिल कांबळे
नागपूर,
Dayashankar Tiwari भारतीय जनता पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचा व्हाॅट्सअॅप नंबर सायबर गुन्हेगारांनी हॅक केला. त्यांच्या क्रमांकावरुन त्यांच्या परिचितांना पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिवारी यांनी तक्रार दिली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Dayashankar Tiwari मंगळवारी दुपारी अज्ञात आराेपीने दयाशंकर तिवारी यांच्या माेबाईल क्रमांकावरील व्हाॅट्सअॅप हॅक केला. त्यानंतर त्यांच्या नावाने विविध व्यक्तींना संदेश पाठवून ‘यूपीआय काम करत नाही’ असे सांगत पैशांची मागणी करण्यात आली. तसेच संध्याकाळपर्यंत रक्कम परत करण्याचे आश्वासनही देण्यात आले. वेगवेगळ्या लाेकांकडून वेगवेगळ्या रकमेची मागणी करण्यात आली हाेती. दरम्यान, एका मित्राला असा संशयास्पद संदेश आल्यानंतर त्यांनी तत्काळ तिवारी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी हा प्रकार उघड झाला. त्यानंतर तिवारी यांनी त्वरित सायबर पाेलिसांना माहिती दिली. तिवारी यांनी साेशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्या नावाने येणाèया काेणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नये. अशा संदेशांची त्वरित तक्रार करावी आणि काेणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. याबाबत सायबर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक बळीराम सुतार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत मला काेणतीही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया दिली.