मध्यमवर्गीयांसाठी एसीपेक्षा आपला कुलर बरा

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
उष्णतेचा कहर, कुलरची मागणी
कूलरचा भाव वाढला, १० ते १५ टक्के महाग
वर्षाला ३ लाखावर कूलरची निर्मिती
नामदेव भदे
नागपूर,
Demand for coolers in the city उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या नागपुरकरांना उन्हाळ्यात सर्वप्रथम कुलरची व्यवस्था करुन ठेवावी लागते. गत काही दिवसांपासून उष्णतेचा कहर वाढल्यानंतर कुलर बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. शहराचे तापमान ४५अंश सेल्सिअस पार गेल्यानंतर कुलरची हवा मिळवण्यासाठी एअर कूलर हा सर्वाधिक वापरला जाणारा नागपूर शहरातील पर्याय आहे.
 
cool
 
थंडावा मिळवण्यासाठी घरोघरी कूलर
मुख्यत:उन्हाळ्यातील दिवसात कुलर घ्यावा की एसी असा प्रश्न अनेकांसमोर असतो. मात्र एसी घेणे परवडत नसल्याने एअर कूलरचा आधार घ्यावा लागतो. उन्हाळ्यातील एप्रिल, मे महिना सर्वाधिक उष्णतेचा असल्याने थंडावा मिळवण्यासाठी घरोघरी कूलर एकमेव ठरतो. यातही उकाडा वाढतच कुलर उद्योगाला चांगले दिवस येते. उष्णतेचा पारा वाढताच कूलर बाजारात तेजी दिसून येते. एसीचे बिलही जास्त येत असल्याने मध्यमवर्गीयांकडून कुलर सर्वाधिक मागणी होत असते. कूलरच्या बाजारात सध्या दोन प्रकारचे कुलर विकले जात आहेत. एक म्हणजे प्लॅस्टिक कूलर आणि दुसरा म्हणजे मेटल कूलर मोठ्या प्रमाणात विकल्या

१५ हजारापर्यंतचा कूलर बाजारात
नागपूरच्या बाजारात २ हजार ते १५ हजारापर्यंतच्या कुलर्सचा मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे. यापूर्वीच उन्हाचा तडाखा सुरु झाल्यामुळे मार्च महिन्यात कूलर विक्रीचे सर्वाधिक ‘टार्गेट’ पूर्ण झाले आहे. सध्याच्या घडीला इतर राज्यांतून कूलरची मागणी होत असल्याची माहिती कुलर विक्रेते मुन्ना रेयाणी यांनी दिली आहे. आगमी दोन कुलरची मागणी राहणार असल्याने शहरातील कूलर कारखाण्यात कूलर तयार करण्याचे काम सुरुच असते. कच्च्या मालाची किंमत काही प्रमाणात वाढल्यामुळे कूलर जवळपास १० ते १५ टक्के महाग झाला आहे.
कूलर विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल
Demand for coolers in the city नागपुरातील कूलर उत्पादकांकडून वर्षाला जवळपास ३ लाखावर कूलरची निर्मिती होते. या उद्योगातून दरवर्षी अनेकांना रोजगार मिळतो. याशिवाय संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक शहरात तसेच मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, ओडिशा या राज्यांमध्ये कूलर पाठविले जातात. कूलर विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होत असते. विशेषत: कूलरची किंमत, आकार आणि दर्जानुसार कूलरची किंमत ठरते.
सहा महिन्यापर्यंत युवकांना रोजगार
नागपूर शहरात कूलरच्या सुट्या भागांची निर्मिती आणि विक्री नामांकित ब्रॅण्डचे मेटर कूलर तयार करण्याचे अनेक कारखाने नागपूर शहरात आहे. कूलर उद्योगामुळे किमान सहा महिन्यापर्यंत अनेक युवकांनाही रोजगार मिळतो. दरम्यानच्या काळात कुलर दुरूस्तीच्या कामातून अनेकांना रोजगार मिळतो, अशी माहिती कूलरचे विक्रेते हिमांशू डेंबले यांनी दिली आहे.