ढोरखेडा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
मालेगाव, 
youth-commits-suicide : तालुक्यातील ढोरखेडा येथील २६ वर्षीय युवकाने २५ एप्रिल रोजी सायंकाळी शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.
 
 
lk
 
 
 
प्राप्त माहितीनुसार, ढोरखेडा येथील रहिवासी गोपाल हरीभाऊ सावले वय २६ याने २५ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता आपला भाऊ अनिल हरीभाऊ सावले यांना फोन करून मी जात आहे, असे सांगितले आणि मोबाईल बंद केला. अनिल सावले यांनी ही माहिती आपला चुलत भाऊ कुंडलिक शंकर सावले यांना दिली. त्यानंतर कुंडलिक सावले यांनी शेजारी शेतकरी बळीराम श्रीराम कुटे यांना फोन करून गोपाल यांचा शोध घेण्यास सांगितले. गोपाल याची मोटारसायकल शेतात उभी दिसल्यानंतर बळीराम कुटे यांनी परिसरात शोध घेतला असता, गोपाल सावले हा पद्माकर राजाराम मेटकरी यांच्या शेताच्या बांधावर लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. शिरपूर पोलिस ठाण्याला माहिती दिल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. अंत्यसंस्कार व इतर कौटुंबिक कार्यक्रमानंतर तक्रार दाखल करण्यात आली. दाखल तक्रारीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात मर्ग कायम करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार केशव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रामेश्वर जोगदंड करीत आहेत.