जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीराम खत्री

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
यवतमाळ, 
Election of District Newspaper Vendor Welfare Society जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्थेची निवडणूक रविवार, 26 एप्रिलला वसंतराव नाईक शेतकरी भवन वाहनतळ येथे झाली. संस्थेच्या अध्यक्षपदाकरिता श्रीराम खत्री आणि संतोष शिरभाते यांंनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविनाश पांडे आणि आसिफ शेख यांची नेमणूक करण्यात आली होती.
 
 
khatri
 
Election of District Newspaper Vendor Welfare Society  संस्थेच्या एकूण 105 सदस्यांपैकी 99 सदस्यांनी मतदानात भाग घेतला होता. मतमोजणीमध्ये श्रीराम खत्री यांना 64, तर संतोष शिरभाते यांना 34 मते मिळाली आणि श्रीराम खत्री अध्यक्षपदी निवडून आल्याचे निवडणूक अधिकाèयांनी जाहीर केले. संघटनेच्या सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी संस्थेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर केली. उपाध्यक्ष : राजू हनवते आणि सचिन कदम, सचिव : किरण कोरडे, सहसचिव : तुषार गुजलवार, कोषाध्यक्ष : प्रवीण आगलावे, प्रसिद्धीप्रमुख : राजू भलावी, सल्लागार : कस्तुरचंद सेठीया, कार्यकारणी सदस्य : अशोक शिंदे, प्रभाकर वडे, धर्मेंद्र मुनोत.