मोठा खुलासा! व्हॉट्सॲपवर ९,४०० बनावट खाती बंद

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
fake-accounts-closed-on-whatsapp : देशात वाढत असलेल्या ‘डिजिटल अरेस्ट’ नावाच्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. व्हॉट्सॲपने अशा फसवणुकीशी संबंधित तब्बल ९,४०० खाती बंद केल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.
 
 
 
banned
 
 
सरकारकडून सांगण्यात आले की, या प्रकरणाची तपासणी भारतीय सायबर क्राईम समन्वय केंद्र (आय४सी) आणि इतर यंत्रणांच्या मदतीने करण्यात आली. या फसवणुकीत आरोपी स्वतःला पोलीस, सीबीआय किंवा इतर तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना भीती दाखवत पैसे उकळत होते.
 
तपासात असेही समोर आले आहे की, अशा प्रकारचे अनेक फसवणूक रॅकेट्स परदेशातून चालवले जात होते. केंद्र सरकार आणि विविध यंत्रणांनी एकत्रितपणे या प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे.
 
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात या प्रकाराबाबत सुरू असलेल्या सुनावणीत सरकारने ही माहिती सादर केली असून सायबर गुन्हे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.