किरकोळ वादातून रॉडने जीवघेणा हल्ला

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
मालेगाव, 
fatal-attack : किरकोळ कारणावरून दोन जणांनी एका युवकावर रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहरातील शिरपूर फाटा परिसरात २६ एप्रिल रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी मालेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
k 
 
प्राप्त माहितीनुसार डॉ. उमेश विश्वनाथ तारे (वय ३५) रा. जाट गल्ली, मालेगाव हे मित्रासोबत जेवण करून स्कुटीने घरी जात असताना शिरपूर फाटा येथे आरोपी अनिकेत रमेश शिंदे व विनय गजानन सौभागे (दोन्ही रा. मालेगाव) हे मोटरसायकलवर येऊन कोणतेही कारण नसताना लोखंडी रॉडने डोयावर वार करत मारहाण केली. त्यानंतर स्कुटी पळवून नेण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पाठलाग करत स्कुटीला धक्का देऊन खाली पाडले. यानंतर जिवाने मारून टाका अशी धमकी देत आरोपींनी पुन्हा रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात आशुतोष विष्णू कंकाळ (रा.मालेगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 
 
घटनेनंतर जखमी बेशुद्ध पडल्याने तो मरण पावल्याचे समजून आरोपी घटनास्थळावरून मोटरसायकलने पसार झाले. या घटनेची तक्रार उशिरा रात्री दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी चिंचोळकर करीत आहेत.