तडीपार गुन्हेगारांना शहरात कुणाचा आश्रय?

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
- तडीपार गुन्हेगारांचा शहरात मुक्तसंचार
- पाेलिसांच्या कार्यप्रणालीबाबत संभ्रम

अनिल कांबळे
नागपूर, 
Fugitive criminal गेल्या काही महिन्यांपासून तडीपार गुन्हेगारांचा शहरात मुक्तसंचार वाढला आहे. पाेलिसांच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे अनेक गुन्हेगार बिनधास्तपणे िफरत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक पाेलिस ठाण्यातील खुीया विभागाचे गुन्हेगारांशी ‘संबंध’ वाढल्यामुळेच तडीपार गुन्हेगार शहरात शिरकाव करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या तडीपार गुन्हेगारांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धाेका निर्माण झाला आहे. तसेच महिला सुरक्षेला तडा जात असून अवैध धंद्यांमध्ये तडीपारांचा सहभाग दिसत असल्याची चर्चा आहे. दाेन वर्षांसाठी नागपूर शहर व जिल्ह्यातून हद्दपार केलेला असतानाही शहरात बेकायदेशीरपणे वावरणाèया एका सराईत गुन्हेगाराला राणाप्रतापनगर पाेलिसांनी अटक केली. राेशन ज्ञानेश्वर काेडापे (27, सुभाषनगर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे.
 

tadipar 
 
Fugitive criminal  माहितीनुसार, साेमवारी रात्री 11.50 वाजताच्या सुमारास राणा प्रतापनगर पाेलिसांचे तपास पथक हद्दीत गस्त घालत हाेते. यावेळी त्यांना गाेपनीय माहिती मिळाली की, हद्दपार असलेला राेशन काेडापे हा प्रज्ञाशील बुद्ध विहाराजवळ संशयास्पदरित्या वावरत आहे. माहिती मिळताच पाेलिसांनी तातडीने सापळा रचला. पाेलिसांना पाहताच राेशनने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पाेलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चाैकशी केली असता, ताे नागपूर शहर आणि ग्रामीण हद्दीतून दाेन वर्षांसाठी हद्दपार असल्याचे उघड झाले. परिमंडळ 1 च्या पाेलिस उपायुक्तांनी 12 नाेव्हेंबर 2024 राेजी त्याच्या हद्दपारीचे आदेश काढले हाेते. हद्दपारीचा काळ संपण्यापूर्वीच आणि काेणतीही पूर्वपरवानगी न घेता राेशन शहरात परतला हाेता. ताे पुन्हा एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने परिसरात वावरत असल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास आले. यावरून पाेलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

गुन्हेगारांचे वर्चस्व वाढले !
शहरात गुन्हेगारांच्या मनात गुन्हे शाखेची माेठी दहशत हाेती. डीबी पथकाचे रुपांतर वसुली पथकात झाल्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकांकडून नागरिकांना माेठी अपेक्षा हाेती. मात्र, सध्या शहरात गुन्हेगारांचे वर्चस्व वाढताना दिसत असून पाेलिसांवर हल्ले करण्याची आणि त्यांची वाहने घेऊन पळून जाण्यापर्यंत गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने पुन्हा आपला दरारा निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.